महाराष्ट्र

आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढणार ?

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आदित्य ठाकरे यांना शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे. आदित्य ठाकरेंसाठी मुंबईतल्या सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सुरू असल्याचे देखील काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं.

‘आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून निवडणूक लढवावी आणि राज्याचे नेतृत्व करावं’, अशी शिवसेनेच्या गटप्रमुखांनी मागणी केली. गटप्रमुखांच्या या मागणीवर आमदार अनिल परब यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. पुढे ते असंही म्हणाले की,विधानसभा निवडणुकीत वरळीतला जो उमेदवार आहे, तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो मुख्यमंत्री म्हणजेच आदित्य ठाकरे आहेत’. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of