महाराष्ट्र मुंबई

आनंदाची बातमीः मान्सून कोकणात दाखल

पुणे –  गुरुवारी मान्सून कोकणात दाखल झाला आहे. हवामान खात्याने सुद्धा मान्सून दक्षिण कोकण आणि गोव्यात पोहोचल्याचे जाहीर केले आहे. आता बळीराजा सुखावणार असल्याची चिन्हे आहेत.

नियोजित वेळेपेक्षा ८ दिवस उशीराने केरळात दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल ही वायू चक्री वादळामुळे संथ झाली होती.  १४ जूनला मान्सूनने केरळाचा संपूर्ण भाग व्यापला आणि त्याने दक्षिण कर्नाटकमध्ये प्रवेश केला. त्यानंतर १८ जूनच्या आसपास त्याने संपूर्ण कर्नाटक व्यापला. त्याचवेळी कोकण आणि गोव्यात पूर्व मोसमीपावसाने हजेरी लावत मान्सून लवकर येत असल्याची चाहुल दिली होती. गुरुवारी अखेर मान्सूनने पुढे सरकत गोवा आणि दक्षिण कोकणसह दक्षिण-मध्य महाराष्ट्रापर्यंत मजल मारली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of