महाराष्ट्र

उल्हासनगरमधील 5 मजली इमारत कोसळली

उल्हासनग कॅम्प नं 3 मधील महेक ही 5 मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

उल्हासनगर कॅम्प नं -3 लिंक रोड येथील पाच मजली महेक इमारतीमधील घरांचे सोमवारी (12 ऑगस्ट) सकाळी 8 वाजता दरवाजे उघडत नव्हते. या प्रकारामुळे घाबरलेल्या लोकांनी महापालिका अग्निशमन दलाच्या कार्यालयात फोन करून याबाबत माहिती दिली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी सर्वांचे दरवाजे उघडून लोकांना इमारती बाहेर सुरक्षितरित्या बाहेर काढले. यावेळी इमारत एका बाजूने झुकल्याचे उघड झाले होते.

इमारत कोसळल्याने काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणत प्लॉटधारकांनी परमेश्वरांसह पालिका अधिकाऱ्याचे आभार मानले आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of