महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये कृत्रिम रेतन लॅब सुरु करणार : मुख्यमंत्री

जालना

शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन हा उत्तम मार्ग आहे.पशुपालनात विविध जातींचे संवर्धन होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरउंचावण्यासाठी कृत्रिम लिंग निर्धारित  रेतन लॅब (प्रयोगशाळा) महत्त्वाची आहे.म्हणून ही लॅब मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत सुरु करण्यातयेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज येथे केली.त्याचबरोबर प्रायोगिक तत्वावर गायींचा विमा उतरविण्यात येईल, असेही तेम्हणाले.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पटांगणावर आयोजित करण्यातआलेल्या भव्य अखिल भारतीय स्तरावरील महा पशुप्रदर्शनाचा समारोप वबक्षीस वितरण समांरभ श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला.  त्यावेळी ते बोलतहोते. यावेळी पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर, पाणीपुरवठा वस्वच्छतामंत्री  बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय,  वस्त्रोद्योगराज्यमंत्री अर्जुन खोतकर, सर्वश्री आमदार नारायण कुचे, प्रशांत बंब, जिल्हापरिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, प्रधान सचिव अनूपकुमार, विभागीय आयुक्तडॉ.पुरुषोत्तम भापकर, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप,जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीनिमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या आदींची प्रमुख उपस्थितीहोती.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,  देशातले सर्वात भव्य असे हे महाएक्स्पोप्रदर्शन आहे. देशात पशुपक्ष्यांच्या प्रजातीला एकत्र करण्याचे काम याप्रदर्शनाच्या माध्यमातून झाले आहे. पशुसंवर्धन, चारा याबरोबरचपशुपक्ष्याच्यां संवर्धनाचे प्रशिक्षण येथे अनुभवयास मिळाले. एवढचे नव्हे तरप्रदर्शन शेतकरी आणि पशुपालकांसाठी आदर्श अशी कार्यशाळा ठरली आहे.  पाचलाख शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. ही या प्रदर्शनाची उपयुक्तताआहे.  शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडव्यवसायनिवडणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतीला पशुपालनाची जोड दिली तेथेशेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या नाहीत. शासनामार्फत पशुपालकांसाठी 243कोटी रुपयांची जनावरे वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. याचा फायदाबहुसंख्य लाभार्थ्यांना झालेला आहे. पशुखाद्याबरोबरच पशुपालकांना कृत्रिमलिंग निर्धारित  रेतन लॅब महत्त्वाची ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of