पुणे – अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक पिकांचे नुकसान झाले आहे.त्यात नवीन कांदा पिकाचे देखील नुकसान झाले आहे.त्यामुळे जुना कांद्याचे परराज्यातून असलेल्या मागणीमुळे भाव कडाडले आहेत.

परिस्थिती पाहता डिसेंबरपर्यंत कांदा तेजीत राहणार असल्याचा अंदाज मार्केट यार्डातील व्यापारी रितेश पोमण यांनी वर्तविला आहे. सध्या घाऊक बाजारात नवीन कांद्याला किलोस 10 ते 30 रुपये, तर, जुन्या कांद्यास 30 ते 40 रुपये भाव मिळत आहे. दर्जानुसार 50 ते 80 रुपये किलो भावाने किरकोळ बाजारात कांद्याची विक्री होत आहे.

दोन महिन्यांपूर्वी कांद्याची घाऊक बाजारात 15 ते 20 रुपये किलो भावाने विक्री होत होती. मात्र, जास्त प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसल्याचे सांगत रितेश पोमण म्हणाले, नवीन कांदा आता बाजारात येणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे 50 टक्के नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. रविवारी केवळ 300 पोती नवीन कांद्याची आवक झाली.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of