महाराष्ट्र

केमिकल कंपनीत स्फोट; सात जणांचा मृत्यू

धुळ्यातील केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

धुळ्यातील शिरपुरजवळ एका केमिकल कंपनीत शनिवारी सकाळी भीषण स्फोट झाला. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या स्फोटामुळे आसपासचा परिसरही हादरला असून नागरिकांमध्येही भितीचं वातावरण पसरलं आहे. अद्यापही आग धुमसत असून परिसरात आगीचे लोट पसरले आहेत. दरम्यान, या ठिकाणी काही लोक अडकल्याची भितीही वर्तवण्यात येत आहे. या घटनेत सात जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of