महाराष्ट्र

कोल्हापूरात जिल्हाबंदीचे आदेश अखेर मागे

महापुरामुळे कोल्हापूरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून कोणताही अनूसुचित प्रकार घडू नये म्हणून राज्य शासनाने जिल्हाबंदीचे आदेश काल दिले होते. मात्र नागरिकांनी टीका केल्यानंतर अखेर हा आदेश मागे घेण्यात आला.

गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या महापुराच्या परिस्थितीमुळे विस्कळीत झालेले मन यातून पूरग्रस्त व नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात १२ ते २४ ऑगस्टला रात्री १२ वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा बंदीचा आदेश जारी केला होता. मात्र, या आदेशाबाबत चहुबाजुंनी टीका झाल्यामुळे अखेर हा जमावबंदीचा आदेश मागे घेण्यात आला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of