महाराष्ट्र

खरच ‘कोरोना’ दिवाळीपर्यंत कंट्रोलमध्ये येणार…?

 

कोरोना वायरसबद्दल आता मोठी दिलासादायक बातमी मिळाली आहे. केंद्रीय स्वास्थ्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगीतले की, या दिवाळीपर्यंत कोरोना वायरसवर नियंत्रण मिळवण्यास आपल्याला यश मिळू शकते. डॉक्टर हर्षवर्धन यांनी अनंतकुमार फाउंडेशन  तर्फे  आयोजित ‘नेशन फ‌र्स्ट’ वेबिनार सीरीजचे उद्घाटन करताना सांगीतले. हर्षवर्धन यांचे म्हणणे आहे की,  संपूर्ण देश या महामारी पासून सुटका मिळवण्याच्या स्पर्धेत फार पुढे आहे. हर्षवर्धन यांनी सांगीतले, ‘कोरोना वायरस या दिवाळीपर्यंत बराच नियंत्रणात येईल. राजकारणी आणि सामान्य लोकांनी मिळून या महामारीशी लढा देण्याचे काम केले आहे. ते बोलले की, भारतात Covid-१९ चे केस येण्याआधी याबद्दल  स्वास्थ्य अधिकार्यांनी बैठक केली होती.

हर्षवर्धन यांनी सांगीतले की, ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याबाबत एक समिति बनवली आहे.’ त्यांनी सांगीतले की, फेब्रुवारीपर्यंत देशात फक्त एक लॅब होती ज्यांची संख्या वाढवून १,५८३ करण्यात आली आहे. यातून १,००० पेक्षा जास्त सरकारी लॅब आहेत. स्वास्थ्य मंत्री यांनी सांगीतले की, देशात प्रत्येक दिवशी जवळजवळ १० लाख टेस्ट करण्यात येत आहेत, जे त्यांच्या ध्येयाच्या पुढे आहे.

हर्षवर्धन हे मेडिकल साहित्यांबाबत सांगताना म्हणाले की, आधिसारखे आता पीपीई किट, वेंटिलेटर आणि N 95 मास्कची कमतरता नाही आहे. ते म्हणाले, ‘देशात प्रत्येक दिवशी पाच लाख पीपीई किट बनवल्या जात आहेत आणि १० निर्माता N 95 मास्क बनवण्याचे काम करत आहेत. २५ कंपन्या वेंटिलेटर बनवण्याचे काम करत आहेत.’

कोरोना वायरसच्या व्हॅक्सीनवर हर्षवर्धन बोलले की, व्हॅक्सीनची ट्रायल जोरात चालू आहे. तीन व्हॅक्सीन आपल्या क्लिनिकल ट्रायल मध्ये आहे आणि चार व्हॅक्सीन प्री-क्लिनिकल ट्रायल येथे चालू आहे. डॉक्टर हर्षवर्धन पुढे म्हणाले की, ‘आम्ही आशा करतो की यावर्षाच्या शेवटपर्यंत व्हॅक्सीन तयार होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो आहे.’

संपूर्ण देशात १७० व्हॅक्सीनवर काम चालू आहे. विश्व स्वास्थ्य संगठन अनुसार देशातील कमीतकमी ३० व्हॅक्सीन ह्यूमन ट्रायलच्या शेवटच्या फेज मध्ये आहे ज्यात भारताची कोव्हॅक्सीन आणि ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीची कोविशील्ड पण शामिल आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of