महाराष्ट्र

छत्तीसगडमध्ये जवानांनी केला 5 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील नारायणपूर येथे ओरछा-गुमरकाच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चमकम झाली. परिसरात नक्षलवाद्यांचा वावर असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानंतर परिसरात शोधमोहीम राबवली गेली. यादरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवळपास तासभर ही चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान जवानांनी पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. शोधमोहीमे दरम्यान नक्षलवाद्यांचे मृतदेहदेखील ताब्यात घेण्यात आले आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of