महाराष्ट्र

जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा; मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावाः शरद पवार

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात 16 जवान शहीद झाल्याची धक्कादायक घटना घडली. गडचिरोलीच्या सी 60 पथकातील जवान खासगी वाहनाने जात असताना नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. आज महाराष्ट्र दिनी ही घटना घडल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीटरवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही. अशी टीका पवारांनी ट्वीट करित केली आहे. तसेच शहीद पोलीस जवानांबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of