गुन्हेगारी महाराष्ट्र

जळगाव हत्याकांडः समोर आली धक्कादायक माहिती

जळगांव – जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा गावात चार अल्पवयीन बालकांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील ३ संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून आरोपींनी बलात्कार करण्याच्या उद्देशाने चारही बालकांची हत्या केल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या चार बालकांमधील 14 वर्षीय मुलीवर आरोपींकडून लैगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे हत्याकांड बलात्कार करण्याच्या प्रयत्नांतून घडल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणातील आरोपींच्या आई-वडिलांनी आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मुलांनी केलेलं कृत्य हे धक्कादायक असून माणुसकीला काळीमा फासणारं आहे, असंही आरोपीच्या आई-वडिलांनी म्हटलं आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of