पुणे महाराष्ट्र

डीएसकेंच्या 13 गाड्यांचा लिलाव होणार !

बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णीं गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत आहेत. त्यांच्या 13 महागड्या गाड्यांचा लवकरच लिलाव होणार आहे. या प्रक्रियेला कोर्टाने मंजूरी दिली आहे.

पोलिसांनी फेब्रुवारी व मार्च 2018 मध्ये डीएसकेंच्या 20 आलिशान गाड्या जप्त केल्या होत्या. यात 19 चारचाकी तर एक दुचाकी आहे. या गाड्या पडून पडून खराब होत असल्याने पोलिसांनी गाड्या विकून पैसे ठेवीदारांना देण्यात उपयोगी पडणार असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ.शिवाजी पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गव‌‌ळी यांनी ही कामगिरी केली.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of