महाराष्ट्र मुंबई

‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..!

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारी पद भूषवणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वेगळीच चर्चा चालू आहे. फडणवीस हे आता राष्ट्रीय राजकारणात जाणार का? अशी चर्चा असून फडणवीस आता दिल्लीत जाणार असल्याचेही बोलले जात आहे. त्या सगळ्या चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगीतले की, दिल्लीत न जाता आपल्याला महाराष्ट्रातच राजकारण करायचे आहे. “बिहारच्या निवडणुकांसाठी काम करण्याची संधी मला मिळाली असली तरी महाराष्ट्राचे राजकारण सोडण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी खूप काही करायचे आहे”.

पुढे ते म्हणाले,“पूर्वी राज्यातल्या एखाद्या नेत्याला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाली तर सर्व त्याचे अभिनंदन करायचे, आता हे राजकारण संकुचित झाले आहे. पूर्वी अरुण जेटली, अनंतकुमार यांच्यासारखे नेते ही जाबाबदारी सांभाळत होते. आता याकरता पक्षाने माझी निवड केली आहे”. असेही फडणवीस यांनी सांगीतले. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अनेक बाबींवर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, असे बोलल्या जात हेते की, भाजपचे वर्चस्व असलेल्या महानगर पालिकेवर नजर ठेवण्यासाठी तुकाराम मुंढे यांना पाठवण्यात आले आहे. तुकाराम मुंढे यांची नागपूरहून बदली झाली तेव्हा हा चर्चेचा विषय बनला होता. मला त्रास देण्यासाठी जर त्यांची नियुक्ती केली असेल तरी याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. कारण माझी कामे ही ईमानदारीची आहेत ती दोन नंबरची नाहीत. त्यामुळे तुकाराम मुंढेच काय, अन्य कुणीही आले तरी मला फरक पडत नाही. हे सरकार सुडाचं राजकारण करते आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सरकारला असे वाटते की, मीडिया, विरोधीपक्ष, सोशल मीडिया यावर आपल्या विरोधात कोणी बोलू नये कारण कोणी विरोध केला तर त्याच्या मागे बीएमसीला लावले जाते. असे प्रखर शब्दात ते म्हणाले.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of