महाराष्ट्र

नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन होणार

स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे आपला स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार असल्याची माहिती आहे. १ सप्टेंबरला नारायण राणे आपला पक्ष भाजपात विलीन करत भाजपाप्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

भाजपासोबत राहायचे की नाही याचा निर्णय पुढील १० दिवसांत घेणार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्यानुसार त्यांनी आता आपला पक्ष भाजपात विलीन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलनाला राणे यांनी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाची तारीख जाहीर केली.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of