पुणे – परतीच्या पावसाने राज्यात मोठे संकट उभे केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पीकं पावसात वाहून गेली. पावसाचा जोर ओसरत नाही तोवरच पुढील आठवड्यात २०,२१ आणि २२ या तारखेला पुन्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधसाळेनं वर्तवला आहे.

या आधी भारतीय हवामान विभागाने १७ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे पुढील आठवड्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.

परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भेटीसाठी तसेच नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सोलापूर दौरा करणार आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of