महाराष्ट्र

पुरग्रस्तांसाठी 6 हजार 813 कोटींची केंद्रसरकारकडे मागणी

राज्यात आलेल्या महापुरामुळे काही भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यांना आपले हक्काचे घर देखील गमवावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्रसरकारकडे 6 हजार 813 कोटींची मागणी केलेली आहे.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला. हा मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून निधी देण्याची विनंती केली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 6 हजार 813 कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पिकांच्या नुकसानीसाठी 2 हजार 88 कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्य आणि अतिरिक्त मनुष्यबळ 75 कोटी, पडलेली घरे पूर्णपणे बांधून देणार आहोत, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 576 कोटी रुपये देण्याचा निर्णय आहे. तर तात्पुरत्या छावण्यांसाठी 27 कोटी, जनावरांसाठी 30 कोटी, स्वच्छतेसाठी 79 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of