ब्लॉग महाराष्ट्र

‘भगवतगीतेचे पांग पांडवांनी नव्हे, तर शिवाबाने फेडले’

रवींद्र देशमुख

शिवजयंती म्हटले की, लहानपण आठवते. शाळेतील ती भाषणे शिवाजी राजे जेवढे सांगितले गेले आणि जेवढे समजून घेता आले ते जशेच्या तसे या शिवजयंतीच्या निमित्ताने डोळ्यासमोर उभे राहिले. पण शिवाजी नावाचे विद्यापीठ हे जेवढे संशोधन करू तेवढे अद्वितीय असल्याचे अनेक इतिहासकारांनी आधीच लिहून ठेवले आहे. पण दुर्दैव एवढेच की तुम्हा-आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज तेवढेच कळले, जेवढे ते त्यांच्या शत्रुला खटकले आणि भावले. कारण छत्रपतींचा इतिहास लिहायचा म्हटलं की इतिहासकारांना शिवाजी महाराजांच्या तत्कालीन शत्रुंच्या बखरी चाळाव्या लागतात. मग त्यातूनही जेवढे काही मिळाले, ते या महाराष्ट्राचे भाग्यच म्हणावे लागेल. असं असताना शिवाजी महाराज एवढे ग्रेट वाटतात, तर संपूर्ण इतिहास उपलब्ध झाला, असता तर काय, या विचाराने उर भरून येते. प्रबोधनकार ठाकरेंनी म्हटलेच की, शिवाजी म्हणजे ३३ कोटी देवांना भारी ठरलेला योगीराज.

छत्रपतींना मी एक विद्यापीठ म्हणूनच पाहतो. महाराजांचे काहीच पैलू आपल्याला मिळाले, मात्र ३५० वर्षांहून अधिक काळ उलटला असताना महाराजांचे विचार आजही तेवढेच आदर्श वाटतात. मग कोणतही क्षेत्र घ्या. राज्यकारभार घ्या, व्यवस्थापन अर्थात एडमिनिस्ट्रेशन घ्या, शुत्राचा आदर असो, किंवा युद्धनिती. या सर्वच गोष्टीतून महाराजांनी येणाऱ्या पिढीसाठी आदर्श घालून दिला. अगदी शेवटचे म्हणाल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेच होते, मला राज्यघटना लिहिताना छत्रपतींच्या राजकारभाराची मोठी मदत झाली.

शिवाजी महाराज म्हणजे या पृथ्वीतलावरचा प्रथम नागरिकच. जसे आपल्या गावाचा प्रथम नागरिक सरपंच असतो, अगदी तसच. महारांना प्रथम नागरिक मानण्याचे कारणही तसेच आहे. भारताच्या इतिहासात स्वत:चे स्वराज्य निर्माण करावे, असं वाटणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपतींचा जन्म तसा १६३० चा. आणि १६३० ते १५५२ या २२ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राने भूतो ना भविष्य असा दुष्काळ अनुभवला होता. यावरून तुमच्या लक्षात येईलच की अशा परिस्थितीत स्वराज्य निर्माण करणे किती कठिण असेल. मात्र महाराजांनी ते शक्य करून दाखवले. याची इतिहासाला दखल घ्यावीच लागली.

शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज देणारा पहिला राजा म्हणजे शिवाजी. राज्यातील सर्वांना जमिनीचे समान वाटप करणारा पहिला राजा म्हणजे शिवाजी. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कुटुंबातील सदस्यांच्या संख्येप्रमाणे जमिनीचे वाटप करणारा पहिला राजा म्हणून महाराजांकडे पाहिले जाते. त्यासाठी सातबारा ही पद्धत महाराजांनी अस्तित्वात आणली.

महाराजांचे आर्थिक धोरण आजच्या अर्थतज्ज्ञांना देखील विचार करायला लावेल असंच होत. महाराजांनी सर्वप्रथम मंदिरातून धन बाहेर काढले. मंदिर हे प्रार्थनेसाठी असावे, धनाचा संचय करण्यासाठी नव्हे, हे प्रत्येक्षात महाराजांनी आणले. त्यातून राज्यातील शेतकऱ्यांना रोजगार उभा करून दिला. आज आपण जी चेकची पद्धत अंमलात आणली आहे, त्याची सुरुवात खुद्द शिवाजी महाराजांनी केली. त्याकाळी त्याला हुंडी म्हणत. वेतन पद्धत सुरू करणारे छत्रपती पहिले राजे.

याआधी राजाचे सैन्य लुटीला जाऊन गावेच्या गावे ओसाड करून टाकायचे. त्यावेळी त्यांना लुटीतून टक्केवारी दिली जायची. पण महाराजांनी ती पद्धत मोडीत काढत सैनिकांना वेतन सुरू केले. तसेच एखाद्या शहरावर चाल केल्यानंतर लूट करताना देखील अटी घातल्या. पूर्वीची टक्केवारी बंद केल्यामुळे सैनिक जेवढं सांगितले तेवढच करायला लागले. त्यामुळे सहाजिकच सर्वसामान्य रयतेला होणारा त्रास कमी झाला.

महाराजांनी स्वराज्याचा गाडा हाती घेतला त्यावेळी एकूण उत्पन्न ३६००० होते. मात्र महाराजांच्या कुशलतेमुळे हे उत्पन्न एक कोटी ४० लक्ष होणापर्यंत पोहोचले. तेही रयतेला सुखी ठेवून आणि २२ वर्षांच्या दुष्काळाच्या परिस्थितीत.

शेती म्हटलं की, इस्राईलच्या शेतीची उदाहरणे दिले जातात. पाण्याची कमतरता असून देखील इस्राईलने प्रगती केली. अरे पण आमच्या शिवबांनी २२ वर्षांच्या दुष्काळात देखील स्वराज्याच स्वप्न प्रत्येक्षात उतरवले हे काय कमी आहे का ?

बांधकाम क्षेत्रात देखील शिवाजी महाराजांना तोड नाही. महाराजांकडे एकूण ३८० किल्ले होते, अशी नोंद आहे. यापैकी ११० किल्ले महाराजांनी बांधून घेतले. महाराजांच्या कारकि‍र्दीच्या अर्थात ३५ वर्षांच्या काळात हिशोब केल्यास एक किल्ला बांधायला सरासरी ३ महिन्यांचा काळ लागेल. मात्र महाराजांनी हे काम रेकॉर्डब्रेक वेळेत करून दाखवले. असा व्यक्ती भविष्यात पुन्हा जन्माला येईल याची सुताराम शक्यता वाटत नाही. आज साडेतीनशे वर्षानंतरही महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची मजबुती आपण किल्ले भ्रमंतीवर गेल्यावर लक्षात येतेच.

मित्रहो, युद्धनितीविषयी बोलायच झाल्यास, तुम्हा सर्वांना स्वराज्यातील गणिमीकाव्याविषयी ठावूकच आहे. ही युद्धनिती महाराजांनी जगाला दिली. अर्थात याला गोरिला वॉर देखील म्हणतात. याच युद्धनितीच्या जोरावर व्हिएतनामसारख्या छोट्याशा देशाने बलाढ्य अमेरिकेला 15 वर्षे झुंजवून पराभूत केले.

शिवाजी महाराजांच्या आधी अनेक राजे होऊ गेले, पण त्यांच्या युद्धनिती आणि त्याच्याविषयीच्या कल्पना वेगळ्या होत्या. युद्धात मागे हाटायचे नाही, मृत्यू आला तरी चालेला असे धोरण अनेक राजांची होती. पण महाराजांची युद्धनिती वेगळी होती. कमीत कमी डॅमेज होऊन अधिक फायदा करून घेणे यालाच महाराज विजय मानत असते. त्यामुळे ३०० मावळ्यांपासून सुरुवात करणाऱ्या महाराजांचं घोडदळ, पायदळ हजारोंवर पोहोचले होते. युद्ध केवळ शक्तीनेच नव्हे तर युक्तीने जिंकावे लागते, हे छत्रपतींनी दाखवून दिले.

छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे, अष्टप्रधानमंडळ. या अष्टप्रधान मंडळाला जेवढे पॅकेज होते, ते पॅकेज आज घडीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना देखील नाही, हे त्यावेळच्या आणि आजच्या चलनाच्या मुल्यावरून आपल्या लक्षात येईल. त्याच्या खोलात मी जाणार नाही, पण ही सत्य परिस्थिती आहे.

छत्रपती शिवाजी महाराज गो-ब्राह्मन प्रतिपालक असल्याच्या घोषणा ऐकायला मिळतात, मात्र त्यापेक्षाही महाराज महिला सुरक्षेविषयी अधिक आग्रही होते. याचे अनेक उदाहरणे आपल्याकडे उपलब्ध आहेत. महाराजांना एका सरदाराची सून नजराना म्हणून भेट करण्यात आली होती, मात्र शिवाजी महाराजांनी त्या महिलेला आई म्हणून संबोधले, हा मोठेपणा इतिहासाने केवळ शिवाजी महाराजांमुळे अनुभवला होता. हेही तितकेच खरं.

कर्नाटक मोहिमेवर असताना जींजी किल्ल्यावरील महिलेने महाराजांच्या सरदारांना कडवी झुंज दिली. मात्र किल्ल्याचा पाडाव केल्यानंतर सरदाराने महिलेशी गैरवर्तन केले. हे जेव्हा महाराजांना कळले, त्याचवेळी महाजारांनी जवळच्या नात्यातील असलेल्या सरदाराचे क्षणाचा विलंभ न करत हातपाय कलम केले होते. महाराजांनी वयाच्या १५व्या वर्षी रांझाच्या पाटलाला दिलेली शिक्षा सर्वश्रूतच आहे. यापुढे जावून महाराजांनी महाराणी येसूबाईंना स्वराज्याच्या कारभारात कुलाख्तर म्हणून नियुक्त केले होते. जेणेकरून स्वराज्यातील जमाखर्च महाराणी येसूबाई पाहत होत्या. त्यावरून महिला कोणतही जबाबदारी अगदी सहज पार पाडू शकते, हा विचार महाराजांनी त्यावेळी मांडला हे अधोरेखित करणे आवश्यकच आहे.

”प्रबोधनकार ठाकरे शिवरायांना दगलबाजांतील योगीराज संबोधताना दाखल देतात की, श्रीकृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला, पण ती प्रत्यक्षात आचरणात आणून महाराष्ट्राचा राष्ट्रधर्म भगवतगीतेत आहे, हे सप्रमाण सिद्ध केले शिवाजीने. गीतेचे पांग पांडवांनी फेडले नाहीत, ते शिवाजीने फेडले. महाभारतीय इतिहासाला आपल्या बुद्धिप्रभावाने रंगवून चिरंजीव करणाऱ्या दगलबाज श्रीकृष्णाला अर्जुनापेक्षा दगलबाज शिवाजी हाच खरा शिष्य व अनुयायी लाभला, यात मुळीच संशय नाही.’’

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of