महाराष्ट्र

महाराजांच्या किल्ल्यांना हात लावला जाणार नाहीः जयकुमार रावल

Jaikumar raval

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना हात लावला जाणार नाही, महाराजांच्या किल्ल्यासंदर्भातील कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. कोणीतरी या अफवा पसरवत आहे. अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

राज्यातील किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येण्यासंदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत. तसेच किल्ल्यांवर लग्न लावणे, कार्यक्रम करणे असे प्रकार होणार नाहीत,’ असे स्पष्टीकरण रावल यांनी दिले आहे.

महाराष्ट्रात २ प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग १ आणि दुसरे वर्ग २. यापैकी वर्ग १ मध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग १ मध्ये येतात आणि इतर सुमारे ३०० किल्ले हे वर्ग २ मध्ये येतात. वर्ग १ चे किल्ले हे संरक्षित गटात मोडतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्व विभाग या किल्ल्यांचे संवर्धनाचे काम करत असल्याचे स्पष्टीकरण पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिल आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of