महाराष्ट्र

महाराष्ट्र क्रांती सेना विधानसभेच्या 100 जागा लढविणार

महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. स्वबळावर १०० जागा लढवण्याचा निर्धार मराठा क्रांती सेनाने केला आहे. पुण्यात पार पडलेल्या मराठा समन्वयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठा क्रांती सेनेने भाजप – शिवसेना युतीकडे १० जागांची मागणी केली असून समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावर १०० जागा लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. एकूण ४२ संघटनांनी मराठा क्रांती सेनेला पाठिंबा दर्शवला असल्याचा दावाही करण्यात आला आहे. आंदोलनातून तयार झालेलं मराठा समाजाचं नेतृत्व विधानसभेत पाठवण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of