पुणे महाराष्ट्र

मोदींचे भाषण विकासावर कमी पवारांवर जास्त

महाराष्ट्राचे राजकारण फक्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अवतीभोवती फिरते की काय असा प्रश्न जनतेला पडतोय. यात शंका नाहीच,हे सिद्ध केलेय नरेंद्र मोदींच्या प्रचार सभेतील भाषणाने. मोदी हे केवळ आणि केवळ पवारांच टार्गेट करत असल्याचे आपण पाहू शकतो.

आतापर्यंत राज्यात जेवढ्या मोदींच्या सभा झाल्या, त्यात विरोधकांपेक्षा पवारांनाच टार्गेट करण्यात येत आहे.
वर्ध्यातील सभा, अहमदनगरमधील सभा पहा त्यात मोदींनी एकच निशाना ठेवलाय तो ही पवारांवर. त्यामुळे आता चर्चा आहे की, मोदी विकासावर कमी आणि शरद पवारांवरच जास्त बोलतायत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of