महाराष्ट्र

राज्यातील सिंचन क्षेत्र पावणेचार लाख हेक्टरवर ; पंतप्रधान मोदींची दावा

धुळे

देशासह महाराष्ट्रातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी प्रधानमंत्री सिंचाई कृषी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून या योजनेअंतर्गत देशभरातील 99 प्रकल्पांपैकी महाराष्ट्रातील 26 प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे तीन लाख 75 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.

प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते बळिराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत 2407.67 कोटी रुपये खर्चून होणाऱ्या सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा योजनेचे भूमिपूजन, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत निम्न पांझरा मध्यम प्रकल्पाचा (अक्कलपाडा) लोकार्पण सोहळा, धुळे- नरडाणा नवीन रेल्वे मार्ग व जळगाव- मनमाड तिसरा रेल्वे मार्गाचे भूमिपूजन, धुळे महानगरपालिकेसाठी भारत सरकारच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत अक्कलपाडा धरणापासून धुळे शहरासाठी पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटार योजना टप्पा क्रमांक एकचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते भुसावळ- वांद्रे टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या खान्देश एक्स्प्रेस, उधना- नंदुरबार व उधना- पाळधी मेमू ट्रेनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त येथील गोशाळा मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले, निम्न पांझरा प्रकल्प या प्रकल्पापैकी एक होता. त्यावर 550 कोटी खर्च करून प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. राज्यातील पाणीटंचाईसह दुष्काळी परिस्थिती दूर करण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करीत आहे. बऱ्याच वर्षापासून रखडलेल्या या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे.  मराठवाडा, विदर्भ आणि इतर दुष्काळग्रस्त भागासाठी 91 योजनांना मान्यता देण्यात आली आहे. त्यावर चौदा हजार कोटी खर्च होणार आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of