महाराष्ट्र

राष्ट्रवादीतून माढ्यासाठी हा उमेदवार लढवणार निवडणूक

राष्ट्रवादीत लोकसभेत कोण लढणार हा तिढा सूटत नव्हता. आता हा तिढा सोडवण्यात राष्ट्रवादीला यश आल्याचं दिसत आहे.माढ्यातून संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे, तर उस्मानाबादेतून राष्ट्रवादीचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

संजय शिंदे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होण्याची चिन्हं आहेत.माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भाजप समर्थनाने सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष झालेल्या संजय शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.

माढा मतदारसंघातून शरद पवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार होते. मात्र एकाच कुटुंबातून अनेक सदस्य नको आणि नातू पार्थ पवारांना निवडणुकीत नशिब आजमावता यावं, यासाठी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.

त्यानंतर माढ्याचा तिढा सुटता सुटत नव्हता. मोहिते-पाटील कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळत नसल्याचं चित्र पाहून रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला.

त्यामुळे माढ्यातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती. मात्र आता संजयमामांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची राष्ट्रवादीने तयारी केलेली दिसते.

आज दुपारी ४ वाजता शरद पवार यांची बारामतीमधल्या गोविंदबाग या निवासस्थानी पत्रकार परिषद होणार आहे. यात शरद पवार माढ्यातील उमेदवाराची घोषणा करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of