महाराष्ट्र

‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’

“राजकारणात आम्ही सतत एकमेकांविरोधात उभं राहतो, पण संकटसमयी कुटुंब म्हणून सदैव पाठिशी”, असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज हजर झाले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

उद्धव ठाकरे कुटुंबप्रमुख म्हणून राज ठाकरे यांच्या पाठिशी असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. “ही नोटीस हे संकट नाही, एक प्रक्रिया आहे. काय निष्पन्न होणार नाही. उद्धव ठाकरेंनी हे जाहीरपणे सांगितलं आहे”. तसेच ही परीक्षा असते, तटस्थपणे पाहायला हवं. आम्ही राज ठाकरेंच्या पाठिशी आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

Please Login to comment
avatar
1 Comment threads
0 Thread replies
1 Followers
 
Most reacted comment
Hottest comment thread
1 Comment authors
Somnath Recent comment authors
  Subscribe  
newest oldest most voted
Notify of
Somnath
Guest
Somnath

संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी – नक्की राहावे पण समर्थन करू नवे