महाराष्ट्र

सातव्या वेतन आयोगासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे मुंबईत धरणे आंदोलन

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी राज्यातील मनपा कर्मचाऱ्यांनी 29 मार्चला मुंबईतील आझाद मैदानावर एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्याची घोषणा अकोला येथे केली. राज्यातील ‘ड’ वर्ग महानगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील जाचक अटी रद्द करणे व शंभर टक्के सहायक अनुदान मंजूर करण्यासाठी राज्यातील महापालिकेच्या सर्व कामगार कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा शनिवारी अकोल्यात पार पडला.

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्याच धर्तीवर राज्यातील ३५० नगर पंचायती आणि २८ महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, नियमित सेवा विभागात कंत्राटी पद भरण्यात येऊ नये, आश्वासित पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, मयत कामगाराच्या वारसाला २० लाख रुपये पेन्शन अनुदान द्यावे,  नगरपालिकेच्या सीईओ पदाच्या अधिकाऱ्यास मनपाच्या उपायुक्त पदापर्यंत पदोन्नती दिली जाते; मात्र इतर अधिकाºयांना अधीक्षक पदापुढे जाता येत नाही, ही अट शिथिल करावी, कामगार संघटनेच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २९ मार्च रोजी मुंबईत लक्षवेधी धरणे आंदोलन छेडण्यात येईल. त्याची दखल घेण्यात आली नाही तर साडेचार लाख कामगार कुटुंबीय आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालतील, असे ठराव अकोल्यातील मेळाव्यात घेण्यात आले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of