महाराष्ट्र

स्विगी, झोमॅटो,उबर इट्स होणार नाशकातून हद्दपार..?

नाशिक – स्विगी, झोमॅटो आणि उबर इट्स या कंपन्या नागरिकांना अन्न पुरवतात. मात्र यांच्या डिलेव्हरी बॉयकडे अन्न सुरक्षा कायद्यानुसार कुठलेही प्रमाणपत्र नसते. त्यामुळे नाशिकमध्ये या अॅपवर बंदी येण्याची शक्यता आहे.

कारण अन्न औषध प्रशासनाने त्यांना नोटीस बजावली असून 7 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.नाशिकमध्ये खाद्यपदार्थांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या स्वीगी, झोमॅटो आणि उबर इट्सवर या कंपन्यांनी डिलिव्हरी बॉईज ठेवले आहेत.

एकट्या नाशिकमध्येच या कंपन्यांचे जवळपास साडेतीन हजार डिलिव्हरी बॉईज काम करत आहेत. मात्र त्यांच्याकडे अन्न सुरक्षा कायद्यानुसार कुठलेही प्रमाणपत्र नाही. त्यामुळे नागरिकांना पुरवले जाणारे अन्न सुरक्षित कशावरुन या प्रश्नामुळे ते कारवाई करणार आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of