महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोनाचे 6785 नवे रुग्ण

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात नवे 6785 रुग्ण आढळले आहेत. तर 219 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मागील 24 तासांमध्ये 4 हजार 67 रुग्ण बरे झाले. त्यामुळे राज्यात बरे झालेल्या रुग्णांची आत्तापर्यंत 1 लाख 27 हजार 259 इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 55.19 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 6 लाख 49 हजार 263 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 48 हजार 191 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

राज्यात मागील चोवीस तासात जे रुग्ण आढळले आहेत त्यानंतर राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 93 हजार 652 इतकी झाली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of