पुणे महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड मध्ये मास्क न घालणाऱ्यांना 1 हजार रुपये दंड

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका आयुक्त आणि पोलिसांनी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवास करताना मास्क वापरणं बंधनकारक आहे. विना मास्क कोणीही आढळल्यास  दंड आकारण्यात येईल अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक महेसेकर यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

विना मास्क सार्वजिक ठिकाणी फिरणारे, सार्वजिक ठिकाणी उभे असणारे किंवा गाडीवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना 500 ते 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याशिवाय पान, गुटखा खाऊन किंवा त्याशिवायही सार्वजिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींना 500 ते 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत तसंच अनुषांगिक अधिनियमान्वये कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of