महाराष्ट्र

‘संभाजी भिडेंची इस्त्रोच्या अध्यक्षपदी निवड करावी’

sambhaji bhide

अमेरिकेने एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्याने त्यांची मोहिम यशस्वी झाली असल्याचे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केले होते. याच मुद्द्याला धरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस परीक्षित तळोकार यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहीले आहे की, संभाजी भिडेंची इस्त्रोच्या अध्यक्षपदी निवड करावी अशी मागणी या पत्रात केली आहे.

परीक्षित तळोकार यांनी हे पत्र फेसबुकवर पोस्ट केले आहे. भिडे गुरुजींनी अमेरिकेने एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्याने ते यशस्वी झाल्याचे वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भिडे गुरुजींवर याच वक्तव्यावरुन आता त्यांना इस्रोचे प्रमुख बनवण्याची मागणी राष्ट्रवादीने पंतप्रधानांकडे केली आहे. तळोकार यांनी लिहिलेल्या पत्राचा विषय ‘अध्यात्मिक गुरु श्री मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांची इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक करण्याबाबत मागणी,’ असा आहे.

श्रीहरिकोटामधील सगळी सूत्र भिडे गुरुजींच्या हाती गेल्यास ते पंचांग बघून पुढचा कार्यक्रम ठरवतील आणि थोड्याच दिवसात भारताची इस्रो ही संस्था अमेरिकेच्या नासा या संस्थेपेक्षा अव्वल ठरेल,’ असं तळोकार यांनी पत्रात म्हटले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of