पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी 4 आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत टेस्टिंग इन्चार्ज म्हणून आयएएस अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. या चारही अधिकार्यांकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा, ग्रामीण आणि कॅन्टोनमेंट हद्दीतील कोरोना नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे सदस्य सचिव माने, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, कृषि आयुक्त सुहास दिवसे यांची याकामी नियुक्ती झाली. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी याबाबत माहिती दिली.