महाराष्ट्र

‘या’ जिल्ह्यात कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांवर घरीच उपचार

कोरोनाची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर कोल्हापूर जिल्हयात घरीच उपचार करण्यात येणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने या निर्णयाची अंमलबजावणीही सुरु केली आहे.

त्यादृष्टीने खासगी रुग्णालयांना निर्देश देण्यात आले असून लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर त्यांच्या देखरेखीखाली उपचार होतील.

सध्याच्या घडीला दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार सुरु आहेत. अर्थात यासाठी संबंधित रुग्णाच्या घरी स्वतंत्रपणे राहण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. आता आगामी काळात हा निर्णय कितपत यशस्वी ठरतो, हेदेखील पाहावे लागेल. तसेच राज्याच्या इतर भागातही अशाप्रकारची व्यवस्था राबविली जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of