पुणे महाराष्ट्र

आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण

पुणे जिल्ह्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज त्यांचा कोरोना पॉझिटीव्हचा अहवाल आला आहे. त्यांना बिर्ला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी स्वतः त्यांच्या मतदारसंघात जाऊन अनेकदा परिस्थितीचा आढावा घेतला होता. तसेच, गेल्याच आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी आमदार महेश लांडगे देखील तिथे उपस्थित होते.

रविवारी लांडगे यांची प्रकृती थोडी बिघडली. यानंतर त्यांचे स्वॅब टेस्टिंग करण्यात आलं. त्याचा रिपोर्ट आज सकाळी आला ज्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं आहे. महेश लांडगे यांच्या संपर्कात आलेल्यांचा देखील तपशील घेतला जात आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of