महाराष्ट्र मुंबई

भाजपच्या ‘या’ आमदाराने दिला राजीनामा

कल्याण पश्चिम मधील भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्ट वरुन राजीनाम्याची माहिती दिली आहे.

महायुतीने विधानसभा जागा वाटपात शिवसेनेला कल्याण पश्चिमची जागा सोडून माझ्यावर अन्याय केला आहे. यावरून व्यतिथ होऊन मी  १ ऑक्टोबरलाच भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मी कल्याण पश्चिम विधानसभेतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत असल्याने पक्षाला अडचण निर्माण होऊ नये यासाठी आज मी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही  राजीनामा देत आहे, अशी माहिती त्यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे.

Posted by Narendra Pawar on Thursday, 10 October 2019

 

२०१४ साली युती नसताना भाजपच्या तिकीटावर मी कल्याण पश्चिम विधानसभा लढवली आणि मी जिंकून आलो. पक्षाने मला काम करण्याची संधी दिली तेव्हा मी कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन काम केले, असे  असताना मला उमेदावारी नाकारण्यात आली, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of