महाराष्ट्र

बुलढाण्यात कोरोनाचा धोका वाढला; कडकडीत लॉकडाऊन

बुलढाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दि. ७ जुलै ते २१ जुलै २०२० च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.

जिल्ह्यात मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यात यापूर्वीच १५ जुलैपर्यंत प्रशासनाने संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश लागू केले असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, या तालुक्यांमध्ये १५ जुलै नंतर २१ जुलै पर्यंत जिल्ह्याचे एकत्रित आदेश लागू होणार आहेत. मलकापूर उपविभाग वगळता या लॉकडाऊन कालावधीत सर्व दुकाने सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उघडण्यास मुभा असणार आहे. तसेच त्याच दिवशी दुपारी ३ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत अत्यंत कडक कर्फ्यू लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा असणाऱ्या नागरिकांना लॉकडाऊन कालावधीत प्रशासनाकडून पासेस वितरित करण्यात येतील. जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of