महाराष्ट्र

एकादशीच्या दिवशी अमेरिकेने चांद्रयान सोडल्याने यशस्वी झालेः संभाजी भिडे

sambhaji bhide

अमेरिकेने भारतीय एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्यानेच त्यांची चंद्रमोहिम यशस्वी झाली आहे. असे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे.

अमेरिकेने आतापर्यंत ३८ वेळा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. तेव्हा नासाच्या शास्त्रज्ञाने भारतीय कालमापन पध्दतीचा अभ्यास केला आणि उपग्रह एकादशीच्या दिवशी सोडला. तेव्हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्याचे संभाजी भिडे म्हणाले.

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान २ ही मोहीम अगदी शेवटच्या टप्प्यात होती त्याचवेळी विक्रम लँडरचा इस्रोशी संपर्क तुटला. यामुळे सगळे भारतीय हळहळले. मात्र सगळ्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या पाठिशी उभं रहात त्यांच्या प्रयोगाला सलाम केला. ऑर्बिटर सात वर्षे चंद्राच्या कक्षेत फिरणार आहे. विक्रम लँडरचा शोध लागला असल्याचं वृत्तही आता समोर आलं आहे त्यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. अशा सगळ्या स्थितीत संभाजी भिडे यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of