महाराष्ट्र

दुर्गप्रेमी मुख्यमंत्र्यांनी किल्ल्याचा ‘तो’ फोटो पाहिल्यानंतर दिले अधिकाऱ्यांना आदेश

दुर्गप्रेमी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीचे वृत्त पाहिले त्यानंतर त्यांनी लगेच केंद्रातील भारतीय पुरातत्व खात्याला किल्ल्याच्या डागडुजी आणि देखभालीसाठी पावले उचलण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रख्यात छायाचित्रकार आहेत. त्यांनी चित्रित केलेल्या छायाचित्रांचा ‘महाराष्ट्र देशा’ हा संग्रह वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. याशिवाय त्यांचे महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांवर विशेष प्रेम आहे. या प्रेमातून ते दुर्गप्रेमी संघटनेचेही प्रणेते ठरले आहेत. छायाचित्रकार असल्यामुळे इन्स्टाग्राम या छायाचित्रांशी निगडीत समाज माध्यमावरील त्यातही गडकोट किल्ले आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांच्या घडामोडींबाबत ते सजग असतात. यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज इन्स्टाग्रामवर विजयदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलदुर्गाचा एका बुरुजाची पडझड झाल्याचे लक्षात आले. या पोस्टची तत्काळ दखल घेत, त्यांनी भारतीय पुरातत्त्व खात्याला याबाबत माहिती कळविण्याचे तसेच पडझड रोखण्यासाठी आणि या दुर्गाच्या देखभालीबाबतही केंद्राकडील या खात्याकडे पाठपुरावा करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव यांना त्यांनी सूचना दिल्या आहेत.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of