महाराष्ट्र

एकच मंत्र, गर्दी करु नकाः मुख्यमंत्री

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 302 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने एकच मंत्र लक्षात ठेवा. कुठेही गर्दी करु नका. आपण या युद्धात जिंकणार म्हणजे जिंकणारच असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“सध्या उन्हाळा सुरु आहे, त्यामुळे थंड पाणी किंवा सरबत पिणं अगदी घराघरात होत असतं. मात्र शक्यतो ते टाळा, सरबत पिऊ नका. थंड पाण्याची बाटली तोंडाला लावू नका. हे करोनाचा उपाय म्हणून मी सांगत नाही. मात्र यामुळे सर्दी किंवा खोकला झाला तर चिंता वाढू शकते. घरात एसी असेल तर तोदेखील लावू नका. त्यापेक्षा दारं खिडक्या उघडा, मोकळी हवा घरात येऊ द्या” असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of