महाराष्ट्र

‘महाराष्ट्राच्या बदनामीचा कट सहन करणार नाही’

मी सध्या या सगळ्यावर शांत आहे. या सगळ्यावर मी आज बोलणार नाही, मात्र त्यावर एक दिवस मी भाष्य करणार आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. जे राजकारण करत आहेत त्यांना करु द्या.. मात्र महाराष्ट्राची बदनामी मुळीच सहन करणार नाही अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

कोरोनाचे संकट संपले असं काही लोकांना वाटत आहे. त्यामुळे काही लोकांनी  पुन्हा राजकारण सुरू केले आहे.  महाराष्ट्राच्या बदनामी करण्याचा डाव आखला जात आहे. पण, मी  मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे, त्यामुळे सर्व लक्षात ठेवून काम करतोय, अन्यथा उत्तर देण्यास कमी करणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.

आता सारे काही खुले करतो आहोत म्हणजे काही जणांनी पुनश्च राजकारण सुरू केले आहे. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे काही उत्तर नाही. पण महाराष्ट्राच्या बदनामीचा जो काही डाव टाकला जात आहेत, राजकारण केले जात आहे त्यावर मी कधीतरी मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून नक्की बोलेल. पण आज माझ्या दृष्टीने कोरोना महत्वाचा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of