महाराष्ट्र

राज्याचे नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेलः संजय राऊत

शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याची ठाम भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे. राज्याचे नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार असल्याचे विधान त्यांनी यावेळी केले आहे.

आज मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. राऊत म्हणाले, युती तोडण्याचं पाप उद्धव ठाकरे करणार नाहीत.

मतदार वाट बघत आहेत की शिवसेनेचा मुख्यमंत्री कधी होईल? असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. आमच्याकडे भाजपाला वगळून पर्याय तयार आहे आणि संख्याबळही तयार आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. भाजपाकाडे संख्याबळ नसल्यामुळेच ते सत्तास्थापनेचा दावा करत नाहीत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of