पुणे महाराष्ट्र

अवधुत गुप्ते यांना ‘आशा भोसले’ पुरस्कार जाहिर

Composer avadhut gupte

प्रसिध्द पार्श्वगायक आणि संगीतकार अवधुत गुप्ते यांना अठरावा आशा भोसले पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण पुणे येथील चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात  शनिवारी (दि. 14) सायंकाळी साडे पाच वाजता होणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे 2002 पासून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जात आहे. देशपातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास हा पुरस्कार दिला जातो.

पुरस्काराचे वितरण क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते होणार आहे. एक लाख 11 हजार रुपये रोख, शाल व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of