महाराष्ट्र

हर्षवर्धन पाटील यांनी केला भाजपात प्रवेश

harshwardhan patil

कॉंग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच एक मेळावा घेऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसंच त्याच मेळाव्यात त्यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचे संकेत देखील दिले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हर्षवर्धन यांनी योग्यवेळी पक्षप्रवेश केला आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of