महाराष्ट्र

संपूर्ण राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम

महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे.

‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारच्या संवादात याचे संकेत दिले होते. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत दररोज 5 हजारांची वाढ होत आहे. अनलॉक झाल्याने गर्दी वाढली असून त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी लोकांना जाता येईल. मात्र अनावश्यक गर्दी करता येणार नाही. व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी सर्व नियमांचं पालन करणं सक्तिचं करण्यात आलं आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता हे सक्तिचं करण्यात आलं आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of