महाराष्ट्र

राज्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात कोरोनाचे 10,576 नवे रुग्ण

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आज दिवसभरात 10 हजार 576 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आता  3 लाख 37 हजार 607 वर पोहोचली आहे. तर आज 280 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तर आतापर्यत 12,556 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आज 5552 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.62 टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या 1 लाख 87 हजार 769 झाली आहे. राज्यात 8 लाख 58 हजार 121 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 44 हजार 975 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of