पुणे महाराष्ट्र

पुणे कोरोनामुक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उचलले ‘हे’ मोठे पाऊल

पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

आता पुण्याला कोरोना मुक्त करण्यासाठी मुंबईच्या अधिकाऱ्याने सांगितलेला पॅटर्न वापरावा, असा आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

कोरोनाची परिस्थिती कशी आटोक्यात आणायची हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आ वासून उभा आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी यासाठी खास मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पुण्यात पाचारण केलं होतं.

कोरोना नियंत्रणाच्या मुंबईतील अनुभवाच्या आधारावर मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पुणे प्रशासनाला या महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची पुण्यात बैठक घेतली. शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.  पुण्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या पन्नास हजारांवर गेली आहे.

धारावीमध्ये कशा प्रकारे काम केले, काय उपाययोजना केली, कोरोनावर नियंत्रण कशा पद्धतीने मिळवलं. काय -काय केले पाहिजे, अशी महत्त्वाची माहिती चहल यांनी या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना उदाहरणांसह पटवून दिली.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of