महाराष्ट्र

एका पोलीस कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण

संपूर्ण देशात कोरोनाची वाढती संख्या आता चिंतेचा विषय बनला आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील वरळी येथील एका  42 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

या पोलीस कर्मचाऱ्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्याचा परदेश प्रवास किंवा त्याच्या संपर्कातील कोणताही नातेवाईक कोरोनाग्रस्त नाही मात्र, तरीही या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण कशी झाली, याचा शोध घेतला जात आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of