महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा आज राजीनामा दिलेला आहे. महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाईल, असं वाटत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यामुळे तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासोबतच मंत्रिमंडळही बरखास्त झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यपाल नवं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू सरकार चालवा अशी विनंती करु शकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे नवं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of