महाराष्ट्र

रायगडावर नाक घासून भाजपाने जनतेची माफी मागावीः धनंजय मुंडे

भाजपाने रायगडावर येऊन नाक घासून जनतेची माफी मागावी अशी टीका सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

“भाजपाच्या कार्यकर्त्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं आराध्य दैवत असून ते सर्वांच्या रक्तात आहेत. आमच्या महाराजांची तुलना मोदींसोबत करुन भाजपाने त्यांना सुरुवातीपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांप्रती किती घृणा आहे हे दाखवलं आहे,” असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचं रविवारी प्रकाशन करण्यात आलं. दिल्ली भाजपाच्या कार्यालयात पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी हे नेते उपस्थित होते. या पुस्तकाचे वृत्त सोशल माध्यमातून पसरल्यानंतर भाजपावर सगळीकडून टीका केली जात आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of