महाराष्ट्र

नवी मुंबईत पुन्हा 7 दिवसांचा लॉकडाऊन

नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत पुन्हा एकदा 7 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

नवी मुंबईतील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये 29 जूनपासून लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. हा लॉकडाऊन 7 दिवसांसाठी असणार आहे. कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी शहरातील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

नवी मुंबईत आज (26 जून) दिवसभरात तब्बल 224 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजार 853 वर पोहोचला आहे. शहरात दिवसभरात 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर आतापर्यंत एकूण 194 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of