महाराष्ट्र

राज्यात कोरोनाच्या दररोज 5500 चाचण्या होऊ शकतातः राजेश टोपे

राज्यात कोरोनाच्या दररोज 5500 चाचण्या होऊ शकतात अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात कोरोना चाचण्यांची सुविधा देशात महाराष्ट्रात सर्वाधिक असून 13 शासकीय आणि 8 खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज 5500 चाचण्या करू शकतो, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात आतापर्यंत 6323 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून 5911 जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चाचण्यांची सुविधा वाढविण्यासाठी सुरूवातीपासून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. राज्याच्या मागणीची दखल घेऊन केंद्र शासनाने तातडीने शासकीय महाविद्यालय आणि खासगी प्रयोगशाळांना चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of