महाराष्ट्र मुंबई

जवाहरलाल नेहरुंनी लावले होते झाड आज त्याच झाडांवर कुऱ्हाड

आरे वृक्षतोड प्रकरणी पर्यावरणप्रेमी संघटना आक्रमक झाल्या होत्या. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (सोमवारी) तातडीची सुनावणी झाली पुढील सुनावणी होईपर्यंत आरेतील आणखी झाडे तोडू नका, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

आरे कॉलनीत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी झाड लावलं होतं. 4 मार्च 1951 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वृक्षारोपण करून डेअरी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आरे मिल्क कॉलनीचे उद्घाटन केलं होतं. नेहरूंनी वृक्षारोपण केल्यानंतर इथं इतकी झाडं लावण्यात आली की 3 हजार 166 एकर परिसरात पसरलेल्या या भागाला जंगलाचं स्वरूप आलं होतं. मात्र आता त्याच झाडांवर कुऱ्हाड पडली आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रतून पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

आरे प्रकरणात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी शिष्टमंडळाने काल सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगई यांना पत्र लिहले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय सोमवारी विशेष खंडीपीठात या प्रकरणाची सुनावणी केली. दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आरे कॉलनीतील वृक्षतोडीवर स्थगिती आणली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑक्टोबरला होणार आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of