महाराष्ट्र

मराठवाड्यात मुसळधार पाऊस; बीड जिल्ह्यात काही गावांचा संपर्क तुटला

मराठवाड्याच्या काही भागात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील 4 तालुक्यांतील 8 महसूल मंडळांत सोमवारी अतिवृष्टीची नोंद झाली.

पावसामुळे तूर, सोयाबीनला दिलासा मिळाला तरी काढणीला आलेल्या मूग व उडीद पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिकांत पाणी साचल्याने सोयाबीनलाही धोका निर्माण झाला आहे़

परभणी जिल्ह्यातील पालम शहराजवळून वाहणाऱ्या लेंडी नदीला मंगळवारी दुपारी पूर आल्याने नदीपलीकडील पाच गावांचा संपर्क तुटला. गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्प तुडुंब झाला. अर्ध्या उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी पहाटे दमदार पावसाने हजेरी लावली आहे़ तेरणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. जालना शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी पावसाचे जोरदार पुनरागमन झाले.

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of